| |
|

ग्रेट भेट
निखिल वागळे
'ग्रेट भेट' हा ''आयबीएन लोकमत'' वरचा निखिल वागळे यांचा लोकप्रिय कार्यक्रम. गेल्या पाच
वर्षात या कार्यक्रमात दीडशेहून अधिक दिग्गजांच्या मुलाखती झाल्या आणि प्रेक्षकांनी
उदंड प्रतिसाद दिला. यापैकी बहरदार अशा पंचवीस निवडक मुलाखतींचा समावेश या
पुस्तकात करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अण्णा हजारे, आशा भोसले,
मेधा पाटकर, सचिन तेंडुलकर, निळू फुले, डों. श्रीराम लागू, नाना पाटेकर, नारायण सुर्वे,
विठ्ठल उमप, उज्वल निकम, यांच्यापासून थेट अमीर खान, सुधा मुर्तीप्रर्यंत विविध
व्यक्तिमत्वांचा हा वेध आहे.
हा एक पनर्प्रत्ययाचा आनंद तर आहेच, पण बोललेला शब्द छापील स्वरुपात आला की त्याचा
परिणाम किती गहिरा होतो हेही यातून सिद्ध होईल. निखिल वागळे यांचे मुलाखत घेण्याचं
निर्विवाद कोशल्य या संग्रहातून दिसतचं, पण ज्या थोर्यामोठ्यांच्या मुलाखती यात आहेत त्यांच्या
मनाचा मोठेपणा, आयुष्याचे असंख्य पैलू यातून उलगडतात. जुन्या पिढीसाठी हा
प्रेरणेचा खजिना आहे.
किंमत ५००/- रु.
|
|